अटी व नियम
कृपया सुरुवात करण्यापूर्वी खालील अटी व नियम काळजीपूर्वक वाचा..
प्रिय वापरकर्ता
कृपया वेबसाइट वापरण्यापूर्वी खालील अटी आणि नियम अतिशय काळजीपूर्वक वाचा.
तुम्हाला ह्या अटी व नियम मान्य नसल्यास कृपया तुम्ही वेबसाइट वर नोंदणी करू नये.
हा करार तुमचा वेबसाइट वरच्या वापरासाठी आणि सदस्यत्वासाठी कायदेशीर बंधनकारक आहे. हा करार स्न्हेसखा.कॉम द्वारे वेळोवेळी बदलला जाऊ शकतो. सदस्यत्व आणि प्रवेशाचे अधिकार हे आमच्या कडे राखीव आहेत.
ही वेबसाइट फक्त आणि फक्त वैवाहिक हेतूसाठी स्थळे शोधता यावी यासाठी आहे हि डेटिंग वेबसाइट नाही.
I. आम्ही सध्या एक ऑनलाइन पोर्टल चालवत आहोत. आमची शाखा कुठेही नाही, आम्ही सध्या फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लग्न करू इच्छिणाऱ्या वधू-वरांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आहोत.
II. स्नेहसखा हे व्यासपीठ वापरण्यासाठी, तुम्हाला स्नेहसखा.कॉम वर साइन इन करून प्रवेश किंवा नवीन असला तर प्रवेश करण्यासाठी नोंदणी करावी लागेल आणि योग्य सदस्यत्व योजना निवडावी लागेल. तुमच्या प्रोफाइलची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला आमचे पोर्टल वापरण्यासाठी परवानगी मिळेल. आम्ही वापरकर्त्यांकडून कोणती माहिती गोळा करतो आणि आम्ही ती कशी वापरतो याबद्दलची अधिक माहिती साठी जा गोपनीयता धोरण पानावर गोपनीयता धोरण
III. स्नेहसखा.कॉम त्यांच्या इतर सदस्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीसाठी जबाबदार राहणार नाही..
IV. पात्रता:
a) आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे आम्ही सध्या फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्या जो महाराष्ट्र, भारतात आहे त्या साठी वेबसाइट चालवत आहोत त्यामुळे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वधू-वरांसह लग्न करू इच्छितात त्यांनी येथे नोंदणी करावी.
b) भारतीय कायद्यानुसार वधू आणि वर यांचे वय हे विवाहासाठी कायदेशीर वय असले पाहिजे, म्हणजे तुम्ही वधु असाल तर १८ वर्षे किंवा त्याहून अधिक किंवा तुम्ही वर असाल तर २१ वर्षे किंवा त्याहून अधिक हे तुमचे वय असायला हवे.
V. नोंदणी प्रकिया:
a) आम्ही अशा करतो कि स्नेहसखा.कॉम वर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करताना तुम्ही निष्पक्षता आणि प्रामाणिकपणाने तुमची वैयक्तिक माहिती दयाल.
b) स्नेहसखा.कॉम वर एकाच व्यक्तीच्या नावाने दोन प्रोफाइलची नोंदणी करण्याची परवानगी नाही. आम्हाला अशा नक्कल प्रोफाइलला (कोणत्याही सूचना न देता) निलंबित करण्याचा किंवा वेबसाइटवरून काढून टाकण्याचा पूर्ण अधिकार असेल.
c) स्नेहसखा सदस्यत्व केवळ नोंदणीकृत वैयक्तिक सदस्यापुरतेच मर्यादित आहे. कोणतीही संघटना किंवा आमच्या सोबत स्पर्धात्मक व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही संस्था, कंपन्या, व्यवसाय किंवा व्यक्ती स्नेहसखा.कॉम चे सदस्य होऊ शकत नाहीत किंवा ते आमच्या जवळील सदस्यांची माहिती कोणत्याही व्यावसायिक हेतूसाठी वापरणार नाही जर कोणी या बंधनाचे उल्लंघन करत असेल आणि असे आमच्या निदर्शनास आल्यास आम्हाला त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.
VI. ग्राहकांच्या/वापरकर्त्यांच्या जबाबदाऱ्या:
a) ग्राहकाने त्यांचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड सुरक्षित ठेवावा आणि तो कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला सांगू नये.
b) वापरकर्त्याने स्नेहसखा.कॉम च्या इतर सदस्यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून राहण्याआधी आणि आवडत्या स्थळासोबत लग्नाची बोलणी सुरु करण्यापूर्वी योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. म्हणजेच त्या स्थळाने दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची स्वतःहून खात्री केली पाहिजे.
c) तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तुमचे सदस्यत्वता संपुष्टात आणायची असल्यास, तुम्ही आम्हाला आमच्या ईमेल आयडी info@snehsakha.com वर कळवू शकता. आम्ही त्याची खातरजमा करू आणि पोर्टलवरून तुमचे प्रोफाइल काढून टाकू.
d) तुम्ही दुसऱ्याचा मालकी हक्क असणारी माहिती, सामग्री, ट्रेडमार्क किंवा इतर कोणतीही माहिती किंवा त्यांचा फोटो त्या मालकाची पूर्व लेखी संमती न घेता पोस्ट, वितरित किंवा कोणत्याही प्रकारे इथे वापरू करू शकत नाही. अश्या प्रकारे कॉपीराइटचे उल्लंघन होणारे कृत्य आढळल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
e) आमचे व्यासपीठ वापरत असताना, वापरकर्त्याला त्याच्या/तिच्या प्रोफाइलशी संबंधित नसलेले कोणतेही आक्षेपार्ह किंवा अयोग्य फोटो किंवा माहिती पोस्ट/अपलोड करण्याचा अधिकार नाही.
VII. स्नेहसखा.कॉम वरील पैसे परतावा धोरण:
a) तुम्ही तुमची सदस्यत्वता संपुष्टात आणल्यास तुम्हाला आमची सेवा वापरण्यासाठी भरलेल्या सदस्यत्वता शुल्क चा कसलाही परतावा मिळणार नाही.
b) एकदा आमच्या वेबसाइट वरून तुमचे प्रोफाईल हटवले गेले किंवा तुमची सदस्यत्वता रद्द केल्यावर तुम्ही आमच्या वेबसाइट वरील कोणतेही सेवा/फायदे घेऊ शकत नाही आणि तुम्ही भरलेल्या सदस्यत्वता शुल्क चा परतावाही तुम्हाला मिळणार नाही.
VIII. कॉपीराइट धोरण:
स्नेहसखा.कॉम हे वापरकर्त्याने अपलोड केलेल्या/पुरवलेल्या माहितीशिवाय इतर सर्व माहिती आणि बौद्धिक संपदा अधिकारांचे मालक आहे. त्यामुळे त्याचे उल्लंघन झाल्यास स्नेहसखा.कॉम आवश्यक ती कायदेशीर कारवाई करु शकते.
IX. अस्वीकरण:
a) तुमचा विवाह इथे जुळून येईल याची कोणतीही हमी आम्ही देत नाही. तुम्हाला येथे नोंदणी केल्यावर तुम्हाला स्वतःसाठी एक योग्य स्थळ शोधायला लागेल,आम्ही तुम्हाला या प्रक्रियेत मदत करू. तसेच आम्ही कोणत्याही स्थळाच्या पार्श्वभूमीबद्दल आमच्याकडून कोणतेही आश्वासन देत नाही.
b) वापरकर्ता सहमत आहे आणि कबूल करतो की स्नेहसखा.कॉम त्याच्या इतर सदस्यांनी प्रदान केलेली माहिती अपलोड करण्यापूर्वी कोणतीही पडताळणी करत नाही आणि वापरकर्ता स्वतःहून त्याच्या / तिच्या आवडत्या स्थळाची वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती जी त्याने वेबसाइट वर प्रदान केली आहे त्याची तो पडताळणी करेल.
c) वापरकर्ता सहमत आहे की स्नेहसखा.कॉम वर नोंदणी करण्याचा उद्देश फक्त विवाहासाठी स्थळ शोधणे हा आहे आणि दुसरे काहीही नाही.
ग्राहक सेवा
कृपया या कराराशी संबंधित कोणत्याही प्रश्न असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
ई - मेल आयडी: info@snehsakha.com
मोबाईल नंबर: +91 93590 96097
हा करार माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० आणि त्याखालील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डशी संबंधित लागू आणि सुधारित नियमांनुसार एक इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज आहे. हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड संगणक प्रणालीद्वारे तैयार केला जातो आणि कोणत्याही भौतिक किंवा डिजिटल स्वाक्षरीची याला आवश्यकता नसते.